डॉ अमोल चव्हाण डीएम (हृदयरोग तज्ञ) सांगतात – जागतिक आरोग्य संघटने (WHO) अनुसार, हृदयविकाराचा झटका – जगातील १ ल्या क्रमांकाचे प्राणघातक कारण

जगभरात जवळजवळ १.७ कोटी लोकांचे मृत्यू हृदयविकारामुळे होतात . जागतिक आरोग्य संघटने ( WHO ) नुसार , जगभरातील जे मृत्यू संसर्गजन्य नसलेल्या रोगांमुळे ( नॉन कम्युनिकेबल डिसीज NCD ) झालेले आहेत त्यातील भारताचा वाटा एक पंचमांश इतका आहे आणि त्यातील बहुतेक मृत्यू तरूण पिढीतील व्यक्तींचे असलेले दिसून आलेले आहे .

२०१७ मध्ये भारतात सुमारे २६ लाख नागरिकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला . आणि आपल्या देशातील मृत्यूमागील ते प्रमुख कारण होते . भारतात केल्या गेलेल्या एका संशोधनात ( इंटरहार्ट स्टडी ) हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांपैकी ९ ० % पेक्षाही जास्त घटनांच्या बाबतीत , त्यांचा संबंध कमी प्रमाणात फळे व भाज्या खाणे , शारीरिक व्यायामाचा अभाव आणि मानसिक – सामाजिक ताणतणाव यांच्याशी असल्याचे दिसून आले होते .

आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की , हार्ट अॅटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येणे ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असते व त्यात त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आणि उरलेल्यांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबांसाठी तो वैयक्तिक -पातळीवर अत्यंत भयावह असा अनुभव असतो . तुमच्या हृदयाच्या स्नायूला जिवंत राहण्यासाठी प्राणवायूची गरज असते आणि जेव्हा हृदयाच्या स्नायूपर्यंत प्राणवायू पोचवणारा रक्तप्रवाह खूपच कमी होतो किंवा संपूर्णपणे थांबतो तेव्हा हार्ट अॅटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येतो . रक्ताचा पुरवठा थांबल्यामुळे टिश्यू ( उती ) मध्ये प्राणवायू शिल्लक राहात नाही आणि तो मृत्यू पावतो .

हृदयविकाराचा प्रकार –

  • STEMI : हार्ट अॅटॅकचा एक प्रकार , झ ड जो तुमच्या हृदयाला रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाल्यामुळे आलेला असतो .
  • NSTEMI : हार्ट अॅटॅकचा एक प्रकार , here to search ज्यात रक्तवाहिनी अंशत : बंद झालेली असते आणि त्यामुळे रक्तप्रवाहाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले असते .
  • मायोकार्डियल इन्फाक्शन ( MI ) : हृदयाच्या स्नायूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे त्या भागाची हानी होणे किंवा तो भाग मृत होणे .

लक्षणे –

हार्ट अॅटॅक हे अशा अनेक प्रकारच्या परिस्थितींचे ढोबळ वर्णन आहे , ज्यात हृदयाच्या स्नायूला पुरवठा केले जाणारे रक्त अचानक थांबते . हार्ट 3 जाणवणे , धाप लागणे , अस्वस्थ वाटणे किंवा छातीत धडधडणे जाणवत असेल तर त्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका आलेला असू शकतो .

छातीतील वेदना डाव्या बाजूलाच जाणवेल असे नाही आणि अनेकदा या वेदनेचे स्वरूप मध्यभागी तीव्र वेदना किंवा अचानक अत्यंत तीक्ष्ण वेदना इथपासून ते सौम्य ठसठसणाऱ्या वेदनेपर्यंत असते . छातीतील वेदना अनेकदा गंभीर स्वरूपाची असते , परंतु काही व्यक्तींना फक्त किरकोळ स्वरूपाची वेदना जाणवू शकते , जी अपचनासारखी असू शकते . याबरोबरच अनेकदा त्या व्यक्तीला खूप जास्त घाम येतो आणि लवकरच काहीतरी विपरीत घडणार असल्याची भावना जाणवते . चक्कर येणे आणि मळमळणे ही देखील हार्ट ॲटॅकची काही सामान्य लक्षणे आहेत . जर अशी लक्षणे १५ मिनिटांपेक्षा जास्त काळपर्यंत टिकून राहिली , तर ते सामान्यपणे हार्ट अॅटॅक असल्याचे स्पष्ट लक्षण असते .

जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अॅटॅकची लक्षणे जाणवत असतील तर आपण हे करू शकतो : जर रूग्ण शुद्धीवर असेल व त्याला / तिला अस्वस्थ वाटत असेल तर त्याला सुखकर वाटेल अशा स्थितीत हलवा . घट्ट कपडे घातलेले असतील तर ते सैल . • तो / ती हृदयविकाराचे रूग्ण आहेत का हे त्यांना विचारा आणि त्यांच्याकडे नायट्रो – ग्लिसरीन गोळ्या आहेत का हे व्यक्तीला .

आपत्कालीन परिस्थितीत कसे वाचवावे याबद्दल काही लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे . सध्या सगळीकडे वाहतुकीच्या समस्या दिसून येत आहेत , अशा प्रसंगी अॅब्युलन्सची प्रतीक्षा करण्याची वेळ येऊ शकते . त्याऐवजी चांगला पर्याय म्हणजे त्या व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये मोटारीने घेऊन जाणे , जिथे कॅथ लॅब किंवा इमर्जन्सी कार्डिअॅक सेवा ( हृदयविकारासंबंधीच्या सेवा ) असतील .

सूचना –

निरोगी हृदयासाठी आणि रक्ताभिसरणासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा असतो . यामध्ये भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या , पूर्ण धान्ये , कमी चरबीचे मांस , मासे आणि कडधान्ये असावीत व मीठ , साखर आणि चरबीचे प्रमाण मर्यादित असावे . D बैठी जीवनशैली हे भारतासारख्या देशांमधील एक मोठेच आव्हान आहे , जेथे शहरी लोकसंख्या सातत्याने वाढते आहे . आपल्याला सर्वसाधारणपणे शारीरिक व्यायामासाठी वेळ मिळत नाही असेच दिसून येते . हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे नियमितपणे शारीरिक व्यायाम करण्याची आणि शरीराचे वजन निरोगी मर्यादेत राखण्यासाठी

आठवड्यातून ६० मिनिटे शारीरिक व्यायाम करणे अनिवार्य आहे.

 

———-Dr. Amol Chavhan  Dm – Cardiologist.

 

डॉ अमोल चव्हाण डीएम (हृदयरोग तज्ञ) सांगतात – जागतिक आरोग्य संघटने (WHO) अनुसार, हृदयविकाराचा झटका – जगातील १ ल्या क्रमांकाचे प्राणघातक कारण


Random Photos

Creativity Art Gallery Presents AAGHAZ the new beginning Art Exhibition... Posted by author icon admin Jan 30th, 2020 | Comments Off on Creativity Art Gallery Presents AAGHAZ the new beginning Art Exhibition